एक्स्प्लोर

World Cup 2019 : इंग्लंडने अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा उडवत अव्वलस्थान गाठलं

प्रभावी आक्रमणासमोर अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ बाद 247 धावांची मजल मारता आली. आर्चर आणि रशिदनं प्रत्येकी तीन, तर वूडनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानकडून हसमतउल्लाह शाहिदीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर रहमत शाहने 46 आणि असघर अफगाणने 44 धावांची खेळी केली.

मँचेस्टर : इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकातल्या पाचव्या सामन्यात आपला चौथा विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडनं गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान गाठलं. मॅन्चेस्टरमधल्या सामन्यात इंग्लंडनं अफगाणिस्तानला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं. पण जोफ्रा आर्चर, आदिल रशिद आणि मार्क वूडच्या प्रभावी आक्रमणासमोर अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ बाद 247 धावांची मजल मारता आली. आर्चर आणि रशिदनं प्रत्येकी तीन, तर वूडनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. अफगाणिस्तानकडून हसमतउल्लाह शाहिदीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर रहमत शाहने 46 आणि असघर अफगाणने 44 धावांची खेळी केली. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची खेळी केली. मॉर्गनसह जॉनी बेअरस्टोनं 90 तर ज्यो रुटनंही 88 धावांची खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 397 धावांचा डोंगर उभारता आला. यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशीद खान सर्वाधिक महागडा ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या नऊ षटकांत तब्बल 110 धावा कुटल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Unseasoanl Rian : रिमझीम पावसामुळे  पुणेकरांना दिलासा, दुपारपासून पुण्यात रिमझीम पावसाच्या सरीChhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha ठरलं! छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारीSharad Pawar : पहाटेच्या शपथविधीचा अजित पवारांचा दावा शरद पवारांनी फेटाळला, म्हणाले...TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 20 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
अजित पवारांना त्यावेळचं राजकारण कळलं नाही; 2014 साली भाजपला बिनशर्त पाठिंबा का दिला? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
वातावरण फिरलंय... पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यात पाऊस; कोकणातही मुसळ'धारा', बळीराजा चिंताग्रस्त
Chhagan Bhujbal : भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
भुजबळांच्या नाराजीची चर्चा, नाशिकवरून सुरू झालेल्या नाराजीनाट्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद होणार?
Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Lok Sabha Election 2024 : पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुन सुद्धा धक्कादायक निकालाची नोंद!
पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 'या' 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुनही सनसनाटी निकाल!
Embed widget