मास्टर ब्लास्टरच्या पंक्तीत महेंद्रसिंग धोनी दाखल, 350वा वन डे सामन्यांचा टप्पा पार

टीम इंडियाकडून 350वा सामन्यांचा पल्ला गाठणारा धोनी हा भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे. तर जगातला नववा खेळाडू ठरला.

मॅन्चेस्टर : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने मॅन्चेस्टरमध्ये सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत दाखल झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधला विश्वचषकाचा उपांत्य सामना हा धोनीचा 350वा वन डे सामना ठरला.

टीम इंडियाकडून 350वा सामन्यांचा पल्ला गाठणारा धोनी हा भारताचा दुसरा खेळाडू बनला आहे. तर जगातला नववा खेळाडू ठरला. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 463 वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

सर्वाधिक वन डे सामने खेळण्याच्या या यादीमध्ये महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा, शाहिद आफ्रिदी, इनझमाम मुल हक् , रिकी पॉन्टिंग, वासिम अक्रम यांचा देखील समावेश आहे.

सर्वाधिक सामने खेळणारे टॉप 10 खेळाडू

सचिन तेंडुलकर - 463

महेला जयवर्धने – 448

सनथ जयसूर्या - 445

कुमार संगकारा - 404

शाहिद आफ्रिदी - 398

इनझमाम मुल हक् - 378

रिकी पॉन्टिंग - 375

वासिम अक्रम – 356

महेंद्रसिंग धोनी - 350